Wednesday, July 9, 2008

KAvita & News Paper 2020


एकदा ती माझ्याकडे आलीमाझ्याबरोबर 'चल' म्हणाली,'हो' म्हणायच्या आतंच ती देऊन हात, घेऊन गेलीहोतो सोबत आम्ही चालतकधी शांत कधी बोलत,पायवाट निळसर नव्हती संपतनभी चांदणे, चंद्रासंगतगोड गप्पा नव्हत्या थांबतसुरेल आवाज जणू कोकिळेगतमौनामधे भासे दिव्य एक रंगतअनवट सूर, बासरीचे उमलत हसताना ती बाहुली दिसायचीबारीक डोळे अलगद लाजायची,गालांवर खळी नाजुक पडायचीनयन शिंपल्यात, जपावी वाटायचीतरूतळी एका आम्ही बसलोमनीचे सारे तिला मी वदलो,हात थरथरता तिच्या हातातपरि नजर थेट डोळ्यातकाय झालं पूढे सांगत नाही स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,झालो जागा तरी उठलो नाहीकरत विचार पडलो मी,प्रेमामधे तर पडलो नाही !


Posted by Picasa

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!!

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!!

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना

माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……………..

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……………..

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव………….
प्रेमासाठि जगाव………..
प्रेमाखातर मराव…………….

त्याच्या एका हास्यावरती
अवघं विश्व हरावं
अन अश्रुच्या थेंबालाहि
डोळ्यात स्वत:च्या घ्यावं….
दुखाची भागी होऊन ….
सुख त्याच्यावर उधळाव………………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

तु आणि मी हे व्याकरण
प्रेमात कधीच नसावं………….
आपलेपणाच्या भावनेतच
सार मी पण सराव…..
एकमेकांच होऊन
एकमेकांना जपाव………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

मधुर त्याच्या आठवणीमध्ये
रात्र - रात्र जागावं……….
अन चुकून मिटताच पापण्या
स्वप्नात तयाने यावं..
बहरल्या रात्रीत चांदण्या
त्याच्या विरहात झुराव…….
पण खरच……………..

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं……….

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

माझं आंधळ प्रेम…..

माझं आंधळ प्रेम…..

माझी ही एक मैत्रीण होती,
खुप शांत अन अल्लड स्वभावाची,
कधीतरी यायची लहर तेव्हाच ती,
लाजून गालातल्या गालात हसायची..

मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,
असं ती सुमधूर आवाजात बोलायची,
बोलता बोलता मग का कुणास ठाऊक,
ती अचानक गप्प होऊन जायची..

बागेतली फुले तीला आवडायच्याआधी,
ती त्या फुलांना आवडायची,
फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,
आनंदाने लाडावून बागडायची…

तिच्यासोबत चालता चालता,
वाटही कमी पडत असे,
तिच्या सहप्रवासात नेहमीच,
वाट पावलांनाच संपताना दिसे…

अशी काहीशी ती मला खुप आवडायची,
रोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,
तिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,
पण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची..

एकदा असचं तळ्याकाठी बसून,
तिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,
विस्कटू नये म्हणून तरंगाना,
शांत रहा म्हणून सांगत होतो…

तेवढ्यात तिने मला विचारलं,
आज काय झालं आहे तूला?
मी उत्तरलो माहित नाही पण
मला काहितरी सांगायचे आहे तूला..

तुझी दृष्टी होऊन मला,
तुझं व्हायचं आहे,
तेवढ्यात ती उत्तरली,
मला दृष्टी नसेल तरी चालेल,
पण तुला एकदा माझ्या मिठीत,
माझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..

SANTOSH !!@!!

Time Pass




Posted by Picasa

Don’t Trust Girl



Don’t Trust Girl
Posted by Picasa