Tuesday, July 15, 2008

प्रेम करायचे होते………!!!


प्रेम करायचे होते तुझ्या
निरागस त्या रुपावर
मला पाहून मुरडलेल्या
अन् नकट्या नाकावर……..!
प्रेम करायचे होते तुझ्या
नखरेल त्या रूसण्यावर
निपक्षपाती नदी परी
खळाळत्या हसण्या वर……!
प्रेम करायचे होते त्या
श्रावणी हीरवळी वर
हळूच गाली खुलणारया
तुझ्या मन मोहक खळी वर …….!
प्रेम करायचे नवख्या
दिन रात झुरण्या वर
गुंतुन स्वप्नी तुझ्याच
वेड्या परी फिरण्यावर…..!
प्रेम करायचे होते
निरपेक्ष नकारावर
तरी मनात लपवलेल्या
तुझ्या मूक होकरावर…….!
हळूवार तुझे भाव सखी
माझ्या साठी नसण्यावर
तरी […]

No comments: