मनातल्या भावनांना उगच वाट करुन दिली, कालच आणलेली कोरी वही लेगेचच भरुन गेली, बघता बघता हा नवा छंद जडला, शब्दांशी खेळतांना,आय़ुषाचा एक डाव सरला..
तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत !!
रोजच उठायचं एक नवा सूर्य पाहायला, खोटं हासु चेहे-यावर ठेवून, दुस-यांच दुख: प्यायला.. रोजच येते सांज मोकळ्या हातानी, उदया परत येईन, सांगुन गेलायं, तोच सूर्य जातानी..
राहुन-राहुन मला तिची आठवण येते, माझ्या सर्वांगाला शहारुन जाते, ती आता सोबत नाही माझ्या, या वास्तवानेच मला रोज जाग येते
जाताना राणी एक वचन देशील का? लग्नाची हजारो वचने तोडुन एकदा तरी येशील का? शेवटची ईच्छा माझी तुझ्या मिठित मरण्याची, राणी आज तरी मला हो म्हणशील का?
खर प्रेम आय़ुष्यात कधीच मिळत नाही, जिवनाच्या वाटेवरुन चालताना, दुःखाचे काटे वगळुन चालत नाही, खर प्रेम गमावून पहा मग समजेल, याचारोळ्या अशाच काही मला सुचत नाहीत
राग असेल जर माझ्यावर विसरुन जा मला, समजली जर माझी भावना एकदा हसुन जा, नसेल जर नाते ह्र्दया पासुन ते सहज तोडुन जा, जाताना माझ्या सगळ्या कवितांना खोडुन जा
-----------------------------------------------
कुणावर इतकेही प्रेम करु नये कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर ह्रुदय कधी जोडताना असह्य वेदना व्हावी डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये की पानांना ते नाव जड व्हावे एक दिवस अचानक त्या नावाचे डायरीत येणे बन्द व्हावे स्वप्नात कुणाला असेहि बघु नये की आधाराला त्याचे हात असावे तुटलेच जर स्वप्न अचानक हातात आपल्या काहिच नसावे कुणाला इतकाही वेळ देऊ नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा एक दिवस आरशासमोर आपनास आपलाच चेहरा परका व्हावा कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदि आपण त्याची वाट बघावी आणि त्याची वात बघता बघता आपलीच वाट दीशाहीन व्हावी कुणाचे इतकेही ऐकू नये की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा आपल्या ओठांतुनही मग त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा कुणाची अशीही सोबत असू नये की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने डोळ्यात खळकन अश्रु जमावेत कुणाला इतकीही माझी म्हनू नये की त्याचे मीपण आपन विसरून जावे त्या संभ्रमात त्याने आपल्याला ठेच देऊन जागे करावे पण......... कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नय ......
-----------------------------------------------------------------------------------------------------
………का नाही कळली मला ..कविता…
………का नाही कळली मला ..कविता…
अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य मग ..शब्द काय आहेत ?
बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्या ..दुसरे काय ..
आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..?
अव्यक्त मनाला व्यक्त कर्ण्याचे साधन..
की मनात काहीच नाही म्हनुन विचार कर्णार एक चलन
काहीच कळत नाही…
भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ?
की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ?
अस असेल तर काय असत मग […]
-------------------------------------------------
फ़ुल स्टॉप नाही तर निदान कॉमा तरी…..
फ़ुल स्टॉप नाही तर निदान कॉमा तरी…..
शब्द धरताहेत भोवताली फ़ेर
ती येणार.. जन्म घेणार म्हणून
लेखणी उतावीळ सळसळते आहे
ती येणार.. जन्म घेणार म्हणून
शुभ्र को-या कागदाचा कोरा वास
उर भरून घेतोय श्वास
समरस अर्थगंधात होण्यासाठी
ती येणार.. जन्म घेणार म्हणून
सारी तयारी झालीय..आता फ़क्त वाट
ती येणार.. जन्म घेणार म्हणून
मलाही येऊ घातल्यात कळा आतल्या आत
आत्ता फ़ुटेल वाचा…आत्ता होईल जन्म
एका नव्या कवितेचा…
पण…
दाबून ठेवल्यात त्या […]
No comments:
Post a Comment